नांदेड जिल्ह्यात 167 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 21 :- सोमवार 21 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 167 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 99 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 68 बाधित आले.

आजच्या एकुण 661 अहवालांपैकी 394 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 13 हजार 723 एवढी झाली असून यातील 9 हजार 661 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 633 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 47 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण 5 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवार 20 सप्टेंबर 2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मुदखेड तालुक्यातील डोरनाळी येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा, विष्णुनगर नांदेड येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा, कंधार तालुक्यातील बाचोटी येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, इंदिरानगर लोहा येथील 50 वर्षाच्या एका महिलेचा. तर सोमवार 21 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सुंदरनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 361 झाली आहे.

आज बरे झालेल्या 283 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 99 तर अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 68 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 633 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 72 हजार 180,निगेटिव्ह स्वॅब- 13 हजार 723,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 167,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 13 हजार 723,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,एकूण मृत्यू संख्या- 361,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 9 हजार 661,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 633,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 777, आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 47,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 72.67 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *