सुशांतच्या मृत्यूनंतर ८४ दिवसांनी रिया चक्रवर्तीला अटक

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला आज अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल. एनसीबी कार्यालयात सध्या रियाची तिसर्‍या दिवशी चौकशी केली जात आहे. रियाला मुंबईतुन नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अटक केल्याचे केपीएस मल्होत्रा, उपसंचालक, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांनी सांगितले.

rhea_1  H x W:

आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून एनसीबी रियाची चौकशी करत होती. काल आणि परवा तब्बल १० तास रियाची चौकशी झाली.एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. याआधी एनसीबीने रियाचा भाऊ शौविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. सध्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

कुठल्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली जाते. अटकेपूर्वीची ही सर्व प्रक्रिया असते. त्यासाठी रियाला सायन रुग्णालयात नेण्यात येणार आहे. एनसीबीच्या कार्यालयातील महिलांच्या कोठडीची साफसफाई झाल्याने रियाच्या अटकेचे स्पष्ट संकेत मिळू लागले होते. सोमवारी रियाने वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांत सिंगची बहीण प्रियंकाविरूद्ध तक्रार दाखल केली. रियासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे.

Rhea Chakraborty Arrested In Connection To Drugs-Related Allegations In  Sushant Singh Rajput Case

एनसीबीच्या तिसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. तिने ड्रग्स घेतल्याची माहिती आज पहिल्यांदाच अडखळत सांगितली. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबी २५ बॉलिवूडसेलिब्रिटींना बोलावणार आहे. रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे.

रिया चक्रवर्तीला एनसीबी कार्यालयातून थेट मुंबई पोलीसांच्या मार्फत वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले आहे. त्यानंतर तिला न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले जाणार आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दहावी आरोपी म्हणून रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. रियाच्यासह दुसऱ्या गाडीत शौविक उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *