लातूर जिल्ह्यातील काँक्रीट रोडची कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे

मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि. 9 : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत येणारी काँक्रीट रोडची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथील प्रगतीपथावरील काँक्रीट रोडची कामे व सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार धीरज देशमुख, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, राष्ट्रीय महामार्गांची कामे पूर्ण करताना ग्रामीण भागातील रस्त्यांची कामेही वेळेत पूर्ण करण्यात यावीत. मराठवाड्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. अंबाजोगाई ते रेणापूर फाटा (पळशी ते रेणापूर फाटा), लातूर ते पाणगाव आणि औसा ते उमराव या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. याशिवाय जुने राष्ट्रीय महामार्ग आणि नवीन राष्ट्रीय महामार्गाची कामे सुद्धा सुरु असून या सर्व कामाला प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *