विधान परिषद निवडणूक : राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजयाचा गुलाल उधळला

कोकण वगळता भाजपची सर्वत्र पीछेहाट

औरंगाबाद,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  कोकण शिक्षक मतदारसंघ वगळता एकाही मतदारसंघात भाजपला विजयश्री खेचून आणता आलेला नाही.कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. म्हात्रे जरी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढले असले तरी ही जागा शिंदे गटाची होती हे लक्षात घ्यायला पाहिजे.मराठवाडा शिक्षकमध्ये मविआच्या विक्रम काळेंनी सलग चौथ्या विजयाचा विक्रम केला. पण त्यासाठी दुसऱ्या पसंतीपर्यंत थांबावे लागले. शिक्षक संघटनेचे सूर्यकांत विश्वासराव पहिल्या पसंतीत दुसऱ्या तर भाजपचे किरण पाटील तिसऱ्या स्थानी होते. नाशिक पदवीधरमध्ये मविआच्या शुभांगी पाटलांपेक्षा २९ हजारांचे मोठे मताधिक्य घेऊन अपक्ष सत्यजित तांबे विजयी झाले.

राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजयाचा गुलाल उधळला आहे. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विक्रम काळे यांना 23 हजार 580 मतं मिळाली असून, किरण पाटलांना 16 हजार 643 मते  मिळाली आहे. ज्यामुळे विक्रम काळे यांचा 6 हजार 937 मतांनी विजय झाला आहे. 

शिक्षक : मराठवाडा
विक्रम काळे, मविआ
दुसऱ्या पसंतीत विजयी
२३,५७७ मते
किरण पाटील (भाजप) ६,९३४ मतांनी पराभूत

शिक्षक : नागपूर
सुधाकर अडबाले
विजयी (मविआ)
१६,७०० मते
ना.गो. गाणार (भाजप) ८,४८९ मतांनी पराभूत

शिक्षक : कोकण
ज्ञानेश्वर म्हात्रे
विजयी (भाजप)
२०,६८३ मते
बाळाराम पाटील (मविआ) ९,६८६ मतांनी पराभूत

पदवीधर : नाशिक
सत्यजित तांबे
विजयी (अपक्ष)
६८,९९९ मते
शुभांगी पाटील (मविआ) २९,४६५ मतांनी पराभूत

पदवीधर : अमरावती
धीरज लिंगाडे
आघाडीवर (मविआ)
११६५ मताधिक्य
पिछाडीवर (भाजप)
डॉ. रणजित पाटील