वैजापूर तालुक्यातील करंजगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध

वैजापूर,२६ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील करंजगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी माजी आमदार सुभाष झांबड, शिवसेनेचे जेष्टनेते आसाराम पाटील रोठे, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांनी प्रयत्न केले.

सोसायटीच्या या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून रामेश्वर विलास घोडके, कल्याण ज्ञानेश्वर दांगोडे, अशोक दत्तू उशिरे, जयराम मोहन उगले, रामकीसन विठ्ठल घोडके, अनिल आसाराम रोठे, रामहरी शेकू वाळके, किशोर रामराव उगले महिला राखीव मतदारसंघातून शहाबाई तुकाराम कोळसे, हिराबाई अशोक मगर इतर मागासवर्गीय मतदारसंघातून योगेश शाहू पैठणकर, भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदारसंघातून बाळूसिंग मोतीलाल झुरावत तर अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून रविंद्र दामू मोकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.