वैजापूर तालुका:सलग दुसऱ्या दिवशी पाऊस परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल

वैजापूर,७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असून गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

तालुक्यात सरासरी 502 मि.मी.पाऊस पडतो. यावर्षी 7 ऑक्टोबरपर्यंत तालुक्यात 645 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस होत असून गुरुवारी वैजापूर मंडळात सर्वाधिक 57 मि.मी.पाऊस झाला तर खंडाळा मंडळात 54 मि.मी.,शिऊर मंडळात 51 मि.मी. लासुरगांव मंडळात 39 मि.मी., महालगांव मंडळात 33 मि.मी., नागमठाण मंडळात 36 मि.मी.,लोणी मंडळात बोरसर मंडळात 29 मि.मी.,लाडगांव मंडळात 27 मि.मी.तर गारज मंडळात सर्वात कमी 22 मि.ली.पावसाची नोंद झाली.

खरिपाचा हंगाम काढणीला आलेला असतांना परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होणार आहे. काढणीला आलेल्या भुईमूग, बाजरी, मका,सोयाबीन या पिकांचे नुकसान होणार आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता आहे. त्यामूळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहे.

वैजापूर तालुक्यात 7 ऑक्टोबरपर्यंत मंडलनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे :-