खंडाळा येथे डीपीसीअंतर्गत 100 केव्ही ट्रान्सफॉर्मर व सहा खांब मंजूर ; आ. बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर ,​५​ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील येथील शेतकरी व नागरिक विद्युतपुरवठ्यापासून वंचित असल्याने बऱ्याच दिवसापासुन शेतकऱ्यांना अंधाराशी सामना करावा लागत होता. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आ.रमेश बोरणारे यांच्याकडे हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.आ. रमेश बोरणारे यांनी प्रश्नात लक्ष घातले व डीपीसीअंतर्गत 100 केव्ही ट्रान्सफॉर्मर विद्युत रोहित्र व सहा पोलची मंजुरी करून आणली. रविवारी (ता.05) या विद्युत रोहित्राचे लोकार्पण सोहळा आ.बोरणारे यांच्या हस्ते पार पडला.

नागरिकाच्या व शेतकऱ्यांच्या वारंवार मागणीस प्राधान्य देऊन 100 केव्ही ट्रान्सफॉर्मर विद्युत रोहित्र मंजुर झाल्याने या परिसरामध्ये विजेच्या समस्येतून रहिवाशांची सुटका झाली असून सर्व शेतकऱ्यांनी आ.बोरणारे यांचे आभार मानले.

यावेळी खंडाळा गावातील संतोष जाधव ,श्रावण गायकवाड, गोरख भोपळे, सुनील देडके, साईनाथ भोपळे ,सुभाष गायकवाड, सुनील गायकवाड, भगवान थोरात, सुनील लोखंडे, योगेश लोखंडे, प्रकाश जाधव, बापू जाधव, पोपट जाधव, सागर जाधव राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर जाधव, शुभम जाधव, दत्तू जाधव, निलेश जाधव, आकाश जाधव, गौरव जाधव, गोरख जाधव, कार्तिक जाधव, अभिषेक जाधव, शिवाजी पवार यांच्यासह अनेक युवाकार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अब्दुल रहेमान बाबा, संतोष कासलीवाल, सुनील सोनवणे, महावीर शेठ बाफना, राजेंद्र पा जाधव, उपविभागप्रमुख पांडुरंग पा जगदाळे, संदीप पवार, योगेश तारू, दिनकर पा मगर, विजू नाना मगर, रहीमभाई बागवान, रामभाऊ त्रिभुवन, बाळासाहेब शिंदे, गोरखनाथ शिंदे, मन्सूब पा मगर, दीपक शिंदे, अरूण शिंदे, रविंद्र ढगे सर, रशीद कुरेशी, मोसिन कुरेशी, गफार खान, साजिद खान, सलीम कुरेशी, सलीम शहा यांच्यासह  पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.