ओबीसीला आरक्षण ; वैजापुरात विविध राजकीय पक्षांतर्फे निर्णयाचे स्वागत व जल्लोष

वैजापूर,२०जुलै /प्रतिनिधी :- निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे वैजापूर शहरातील विविध राजकीय पक्षांनी स्वागत करून जल्लोष केला. 
भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत,पालिकेतील गटनेते दशरथ बनकर, नगरसेवक शैलेश चव्हाण, गणेश खैरे, स्वप्नील जेजुरकर, अमोल बोरणारे, शैलेश पोंदे,गौरव दोडे,महेश बुणगे,पवन विश्वासू, सोनू राजपूत, ज्ञानेश्वर घोडके, धनंजय अभंग, ऋषी अनर्थे,यांच्यासह भाजप, शिवसेना व प्रहारसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून जल्लोष साजरा केला. यांच्याभाजप,सेना, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोषओबीसी आरक्षणाबाबत दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे भाजप,सेना, व प्रहारच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनखाली बुधवार रोजी फटाके फोडून घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.प्रसंगी बोलतांना डॉ.दिनेश परदेशी यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून  राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुतीचा पायगुण चांगला असल्याने राज्याला चांगली बातमी मिळाली असे संबोधन केले.