एम. जी. एम. विद्याअरण्यम् विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

औरंगाबाद ,२१ जून /प्रतिनिधी :-शिक्षण क्षेत्रात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एम. जी. एम. विद्याअरण्यम् विद्यालय गांधेली, औरंगाबाद येथे २१ जून २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

गुरुकुल शिक्षण पद्धती पुनर्जीवित करून भारतीय कला, खेळ, भारतीय सणे यांना सतत प्राधान्य देणारे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “अष्टकोन” हे शिक्षण मॉडेल सुरु करणारे विद्यालय म्हणून एम. जी. एम. विद्याअरण्यम् विद्यालय अल्पावधीतच नावारूपाला येत आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने विद्यालयात दररोजच योग शिकवले जाते. ‘योग दिवस’ चे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस  विद्यालयाच्या योग प्रशिक्षक श्रीमती योगिनी मुंगीकर यांनी विद्यार्थ्यांना  योगाचा इतिहास, योग दिवस या दिवसाचे महत्त्व, योगाचे जीवनातील महत्त्व व फायदे सांगितले. तदनंतर प्रार्थना, आसनांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, प्राणायाम, भ्रामरी, उद्गीथ घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  श्रीमती पल्लवी भदाणे या होत्या तर सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक व कर्मचारी यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.