शिवसंवाद मोहिम औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात धडकणार
औरंगाबाद,२० जानेवारी / प्रतिनिधी :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना औरंगाबाद शाखेच्या वतीने जिल्ह्यात ३० जानेवारी पर्यंत शिवसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना नेते राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई ,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या मोहिमेत तालुक्यात गाव पातळीवर व शहरात वार्ड स्तरावर संघटनात्मक बांधणी त्याचप्रमाणे विकासात्मक दृष्टीकोनातून विविध विकास कामे या विषयी चर्चा व माहिती तसेच कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येणार असल्याचे या शिवसंवाद मोहिमेचे आयोजक शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

या शिवसंवाद मोहिमेच्या अंतर्गत आमदार अंबादास दानवे तसेच आमदार संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली २१ जानेवारी शुक्रवार रोजी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात शहर व ग्रामीण तालुक्यात सकाळी ९:३० वाजता उपशहरप्रमुख अंबादास मस्के व किशोर कछवाह यांच्या कार्यक्षेत्रातील विभागाची बैठक सत्संग हॉल, मीरानगर, पडेगाव याठिकाणी, स.११:०० वाजता वंजारवाडी, दुपारी १२:३० वाजता गिरनेरा ,दुपारी ४:०० वाजता वसंत शर्मा, सतीश निकम ,राजू राजपूत, संजय बारवाल, संतोष मरमट यांच्या कार्यक्षेत्रातील विभागाची बैठक वेदांत हॉल ,वेदांतनगर या ठिकाणी, सायंकाळी ५:३० वाजता उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, रमेश बहुले यांच्या कार्यक्षेत्रातील विभागाची बैठक बाळासाहेब ठाकरे सभागृह, स्व.मीनाताई ठाकरे नगर सातारा परिसर या ठिकाणी, सायंकाळी ७:०० वाजता उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे,अनिल मुळे ,संजय पवार, रतन साबळे यांच्या कार्यक्षेत्रातील विभागाची बैठक ब्राह्मण समाज मंगल कार्यालय, १२ वी योजना, कलावती शाळेच्या बाजूला, शिवाजीनगर या ठिकाणी होणार आहे.
या बैठकीस उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, बप्पा दळवी ,महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप उपजिल्हा संघटिका अनिता मंत्री, अंजली मांडवकर,युवा सेना युवा अधिकारी हनुमान शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या बैठकांना सर्व शिवसैनिक – पदाधिकारी – महिला आघाडी – युवासेना- इतर अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी शासनाने दिलेल्या सर्व covid-19 नियमावलीचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख विजय वाघचौरे, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे,विधानसभा संघटक सुशील खेडकर, महिला आघाडी शहर संघटिका आशा दातार, तालुका संघटिका जयश्री घाडगे यांनी केले आहे.