गोदावरी नदीपात्रात 1 लाख 13 हजार 684 क्युसेक विसर्ग

औरंगाबाद,१७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- नगर नाशिक जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे नांदूर मध्यमेश्वर नागमठाण या बंधाऱ्यातून तब्बल दीड लाख क्युसेक्स पाण्याची आवक  जायकवाडी धरणात येत असून तेवढाच विसर्ग गोदावरी नदीपात्रात आज करण्यात येणार आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात व वरील बाजूस पडणारा पाऊस व येणारी आवक पाहता हा विसर्ग दोन लाख क्युसेक्स पर्यंत जाण्याची शक्यता प्रशासना तर्फे देण्यात आली आहे.

जायकवाडी पैठण (17 सप्टेंबर 2022      रात्री : 8:00  वाजता)

जायकवाडीत पाण्याची आवक  :  1 लाख 25 हजार 398 क्युसेक

गोदावरी नदीपात्र  :1 लाख 13 हजार 684 क्युसेक विसर्ग