राष्ट्रीय लसीकरण दिन:जालन्यात आरोग्य विभागाच्या वतीने 5 वर्षांच्या आतील बालकांचे लसीकरण

जालना ,१६ मार्च  /प्रतिनिधी :- राष्ट्रीय लसीकरण दिनाचे औचित्य साधुन जालन्यात आरोग्य विभागाच्या वतीने 5 वर्षांच्या आतील बालकांना वेगवेगळ्या लसी देऊन लसीकरण करण्यात आले आहे.

Displaying IMG-20220316-WA0030.jpg

पोलिओ, बीसीजी, गोवर अशा वेगवेगळ्या लसी दिल्यामुळे 5 वर्षाच्या आतील बालकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढुन तसेच लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण कमी होत असल्याने लसीकरण आवश्यक असल्याची माहिती यावेळी माता व बाल संगोपन अधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली. 

Displaying IMG-20220316-WA0029.jpg

16 मार्च हा ‘राष्ट्रीय लसीकरण दिवस’ या दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लहान बालकांच्या लसीकरण मोहिम राबविण्यात येत असते. या दिवशी 5 वर्षाच्या आतील बालकांना आरोग्य विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या लसींची मात्रा देण्यात येते. यामुळे पोलिओ, गोवर आणि इतर आजारांपासुन बालकांचे संरक्षण होते. तसेच यामुळे बालकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत होत असते. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या 5 वर्षाच्या आतील बालकांना या लसीची मात्रा द्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी केले आहे. 

यावेळी शहरातील पाणीवेस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शीतल सोनी, नगर परिषदचे आरोग्य अधिकारी डॉ. गणेश काळे, डॉ. संगीता राजे, डॉ. व्ही. एस. चव्हाण, श्रीकांत वाघमारे,  प्रतीक गायकवाड, मंगल बनसोडे, प्रीती घोरपडे, वैशाली निकाळजे, रंजना काळे यांच्या उपस्थितीत 5 वर्षाच्या आतील बालकांचे लसीकरण करण्यात आले़