पर्यावरण पूरक होळी साजरी करा ; वैजापूर पालिकेचे शहरातील नागरिकांना आवाहन

वैजापूर,१६ मार्च  /प्रतिनिधी :-पालिकेच्यावतीने शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे याअंतर्गत शहरवासियांनी होळी हा उत्सव अत्यंत साध्या व पर्यावरणपूरक अशा पद्धतीने साजरा करावा असे आवाहन वैजापूर पालिकेच्यावतीने होळीच्या पूर्वसंध्येला बुधवारी करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते तथा स्वछतादूत ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, समनव्यक विजय सपकाळ यांनी आज शहरात फिरून व दवंडी देऊन हे आवाहन केले. शहरातील स्टेशन रस्ता, टिळक रस्ता, भाजी मंडई, गांधी मैदान रोड, पंचायत समिती समोरील रस्त्यासमोर पालिकेच्या पथकाने हे आवाहन केले. होळीत लाकडे ऐवजी पाळा पाचोळा, गोवऱ्या तसेच बिडी,काडी ,सिगरेट चे रिकामे पाकीट व विकार जाळून होळी साजरी करावी. लाकडांची होळी करू नका तसेच धुलिवंदन दिनी कोरडा रंग उधळून होळी साजरी करावी, पाण्याचा अपव्यय थांबवावा. असे ही आवाहन करण्यात आले. पालिकेला स्वच्छ मानाकनं  मिळवण्यासाठी 969 या टोल फ्री क्रमांकावर आपले सिटीझन फीड बॅक नोंदवा असे आवाहन करण्यात आले. या फेरीत स्वच्छता निरीक्षक सुरेश चिमटे, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक विष्णू पाटील  आलूले, प्रमोद निकाळे, कारपे, समनवयक विजय सपकाळ, महादेव चांदगुडे, कुणाल दिवेकर, रमेश त्रिभुवन अस्लम शेख, शेख अहेमद, कैलास त्रिभुवन व स्वछता विभागातील कर्मचारी उपस्थित होते.