राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

सर ज.जी. शासकीय रुग्णालयात घेतली कोरोना व्हायरसविरोधी लस

मुंबई, दि. 5 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज मुंबईतील सर ज.जी. समूह शासकीय रुग्णालय येथे जाऊन कोविड-19 विरोधी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला.

यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ.तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ.विजय सुरासे आदी उपस्थित होते.