हिंमत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या, उद्धव ठाकरेंना अमित शाह यांचं खुलं आव्हान

डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अर्थ महाविकास आघाडीने दुसराच घेतला

राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार

महाराष्ट्र सरकार कुठे आहे? अमित शाहांचा घणाघात

 ‘दोन पिढ्या ज्यांच्याविरोधात लढले, त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले’, अमित शहांची शिवसेनेवर जहरी टीका

Image

पुणे,१९ डिसेंबर /प्रतिनिधी :- पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असं म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं आव्हानच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं.

अमित शहा पुण्यात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट ठाकरे सरकारवरच हल्ला करत पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे. तो मी मिळवणारच. तर शिवसेना म्हणते सत्ता हा माझा अधिकार आहे. तो कोणत्याही प्रकारे मी मिळवणारच. बनले मुख्यमंत्री. हिंमत असेल तर राजीनामा द्या. तिघांनी एकत्र येऊन आमच्यासोबत लढा. आमच्याशी दोन हात करा. भाजप कार्यकर्ते तयार आहेत. महाराष्ट्राची जनताही हिशोब करायला बसली आहे, असा हल्ला शहा यांनी चढवला.

शाह यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं दिसत आहे.

Image

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा लढवून दाखवा असं केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं. हे बोलताना त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आधीच ठरलं होतं. मात्र शिवसेनेनं धोका दिला. आम्ही जे बोलतो ते करतो. त्यात आम्हाला अजिबात संकोच किंवा लज्जा नाही असा टोला त्यांनी लगावला.मोदींच्या नावावर निवडून आले आणि विरोधकांसोबत गेले, हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. 

Image

हे तर निकम्म सरकार

राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटोरिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर झालेले आहेत. ते चालत नाही. फक्त धूर सोडतं आणि प्रदूषण करतं, अशी टीका करतानाच महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात जा. हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? असा सवाल करा. देशाचं नेतृत्व या महाराष्ट्राने केलं. सर्व गोष्टीत महाराष्ट्र आघाडीवर होता. कृषीपासून ते सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर होता. हे लोक महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देऊ शकते का? हे निकम्म सरकार आहे. या सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालाने झाली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अर्थ महाविकास आघाडीने दुसराच घेतला’

पंतप्रधान मोदी यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना सुरु केली. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्याची नवी व्याख्या बनवली. काँग्रेसनं त्यातील डी पकडला. त्यांनी डायरेक्ट ऐवजी डिलर शब्द घेतला. शिवसेनेने बी चा अर्थ ब्रोकर असा घेतला आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफरमध्ये कटमनी सुरु केला. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतो हे डिलर, ब्रोकर आणि ट्रान्सफरचा बिझनेस म्हणतात. मग महाराष्ट्राला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हवं की डिलर, ब्रोकर आणि ट्रानस्फरमध्ये कटमनी घेणारं सरकार हवं? असा सवाल शाह यांनी केलाय.

‘मोदींनी इंधनाचे दर कमी केले, यांनी दारू स्वस्त केली’

देशात इंधर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत होता. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय घेत त्यावरील टॅक्स कमी केला. त्यावेळी मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना राज्य सरकारांनीही आपला कर कमी करण्याचं आवाहन केलं. भाजपशासित राज्यांनीही मोदींच्या आवाहनला प्रतिसाद देत इंधनावरील कर कमी केला. पण यांना काही वेगळंच ऐकायला आलं, यांनी इंधन नाही तर दारू स्वस्त केली. असे भाई, दारू स्वस्त करायची नव्हती, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचं होतं, अशी खोचक टीका शाहांनी केलीय. तसंच आता उद्धव ठाकरे सरकारला विचारायला हवं की देशात पेट्रोल-डिझेल 15 रुपयांनी स्वस्त झालं, महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्रातील जनतेला दारु नाही तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त हवं आहे, असंही शाह म्हणाले.

 ‘दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल’, असा घणाघात शाह यांनी केलाय. ते आज पुण्यातील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

शिवसेनेवर टीका करताना शाह म्हणाले की, ‘2019 मध्ये महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही’, अशी जोरदार टीका शाह यांनी शिवसेनेवर केलीय.