वैजापूर तालुका बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
वैजापूर ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन व विविध विकास कामांचे उदघाटन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते रविवारी झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर होते.
यावेळी बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारत (२९.७८ लक्ष रुपये ), व्यापारी संकुल प्रशासकीय इमारत दुरुस्ती (१४.७५ लक्ष रुपये) व शेतकरी निवास इमारत परिसर पेव्हर ब्लॉक बसविणे व स्वच्छतागृह बांधकाम (१२.३८ लक्ष रुपये) आदी ५६ लक्ष ९१ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमास माजी आमदार सुभाष झाबंड, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी.माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, वैजापूर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे संचालक रिखबदास पाटनी यांनी केले.आ.रमेश पाटील बोरणारे,सुभाष झाबंड,भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर,साबेर खान, बाळासाहेब संचेती,बाजार समितीचे संचालक संजय पाटील निकम आदींची यावेळी भाषणे झाली.बाजार समितीचे उपसभापती विष्णुभाऊ जेजुरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी,ऍड.आसाराम रोठे, प्रमोददादा जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, प्रताप निंबाळकर, रामहरीबापू जाधव,दिनकर पवार,उल्हास ठोंबरे यांच्यासह संचालक व शेतकरी उपस्थित होते.