वैजापूर नगरपालिका व विधी सेवा प्राधिकारणतर्फे जेष्ट नागरिकांसाठी कायदेविषयक शिबीर

वैजापूर ,१० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर नगर पालिका, तालुका विधिसेवा प्राधिकरण व वकील संघातर्फे शहरातील जेष्ट नागरिकांसाठी शनिवारी येथे कायदेविषयक जागृती शिबीर घेण्यात आले.या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


पालिकेच्या हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात आयोजित या शिबीराच्या अध्यक्षस्थानी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सचिन शिंदे हे होते तर जिल्हा व सत्र न्यायधीश मोहियोद्दीन शेख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी नागरपालिकेच्यावतीने दिवाकर त्रिभुवन यांनी जिल्हा न्यायाधीश मोहियोद्दीन शाखा व न्या.सचिन शिंदे यांचे स्वागत केले. प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र हरिदास यांनी केले.शिबिरात न्यायाधीश मोहियोद्दीन शेख व न्यायाधीश सचिन शिंदे यांनी जेष्ट नागरिकांशी सवांद साधून त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याविषयी सखोल माहिती दिली.डॉ.एस.एम.जोशी यांनी आरोग्याविषयी जेष्ट नागरिकांना मार्गदर्शन केले.

प्रा.पी.एम.शिंदे,   अंजलीताई जोशी ,ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.या शिबिरास वकील संघाचे उपाध्यक्ष अनिल रोठे,सचीव सईद अली, वैजीनाथ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष काशीनाथ गायकवाड,सचीव धोंडिरामसिंह राजपूत,चैतन्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.पी.एम.शिंदे,आधार जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब शेळके,डॉ.एस.एम.जोशी, बबनराव क्षिरसागर, रवींद्रअप्पा साखरे,महिला जेष्ठ नागरिक संघाच्या अंजलीताई जोशी,अलका साखरे,वैशाली साखरे, सुभाष चाफेकर,सुरेश संत,विठ्ठलसिंग राजपूत, वैजीनाथ मिटकरी, अशोक धसे, सिताराम म्हस्के यांच्यासह जेष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते