पश्चिमवाहिनी नद्यांचे १४५ टीएमसी पाणी गोदावरीत सोडा-जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे जयदत्त क्षीरसागर यांची मागणी

मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवा

बीड,२३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- मराठवाडा हा सिंचनाबाबत मागास राहिला आहे. तसेच सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक पिढ्यानपिढ्या उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे १३५ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे व गोदावरी नदीच्या पात्रात वळवावे. यामध्ये अभ्यास गट स्थापन केला असून जलदगतीने काम सुरू करा. यासाठी मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

Displaying FB_IMG_1629697376592.jpg

मुंबई येथे झालेल्या बैठकीत मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवावा, तसेच डिसल्याची वाडी तालुका शिरूर येथील साठवण तलावास मंजुरी देण्यात यावी अशीही मागणी केली.यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची वरिष्ठ पातळीवर सचिवस्तर व विभागीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. तसेच याबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक पावले, उचलेल असे आश्वासन दिले.