व्यवसाय क्षेत्रात गुणवत्ता अत्यावश्यक-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात सामाजिक न्याय विभागाकडून समता दिंडी गोगाबाबा टेकडी परिसरात वृक्षारोपन औरंगाबाद ,२६ जून /प्रतिनिधी :-  आरोग्य, कृषी, विक्री, विपणन आदी व्यवसाय क्षेत्रात गुणवत्तेला अधिक प्राधान्य अत्यावश्यक आहे. गुणवत्तापूर्ण सेवा, उत्पादनालाच बाजारात, सेवा क्षेत्रात अधिक मागणी असते. त्यामुळे प्रत्येकाने व्यवसायात गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. तरच व्यवसाय, सेवा क्षेत्रात यशस्वी होता येते,  असा यशस्वी होण्याचा मंत्र जिल्हाधिकारी  तथा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज तरूणांना दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी कृतज्ञता पर्व, जयंतीनिमित्त छत्रपती  शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव ‍विकास संस्था (सारथी) आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबींसाठी कौशल्य ‍विकास जनजागृती मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी सारथीचे प्रकल्प संचालक डॉ. श्रीकांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे डॉ. भास्कर साठे, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  सुरेश वराडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  आदींसह युवा वर्गाची बहुसंख्येने उपस्थिती होती.  जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात अतुलनीय असे मोलाचे कार्य केले आहे.  त्यामध्ये प्रामुख्याने शेती, सिंचन, शिक्षण, रोजगार आदी क्षेत्रांचा समावेश आहे. प्रत्येकाने कौशल्य विकासावर भर देत लोकराजा शाहू महाराजांचा ‍विचार अंगीकारणे काळाची गरज आहे. सारथीकडून कौशल्य विकास कार्यक्रमांवर  अधिक भर देण्यात येत आहे. लक्षित गटाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सारथीला पाठबळ दिले  आहे.  औरंगाबाद जिल्हा औद्योगिक, पर्यटनदृष्ट्या व्यवसाय, सेवा क्षेत्रास अनुकुल असा जिल्हा आहे. त्यामुळे येथील युवांना अधिक प्रशिक्षित करून, त्यांच्या नवकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे कार्य सारथी, रोजगार केंद्राच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षाही श्री.चव्हाण यांनी व्यक्त केली.  युवांनी देखील विकेल ते पिकेल या धरतीवरच येथील विविध सेवा क्षेत्रात पुढाकार घेऊन व्यवयायभिमूख होण्याचा सल्लाही श्री.चव्हाण यांनी उपस्थित तरूण वर्गाला दिला. प्रत्येकाने आपण  समाजाचे, देशाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सारथीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अभ्यासवर्गाचे, प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असते.   मराठा, कुणबी, 

Read more