व्यवसाय क्षेत्रात गुणवत्ता अत्यावश्यक-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

  • लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात
  • सामाजिक न्याय विभागाकडून समता दिंडी
  • गोगाबाबा टेकडी परिसरात वृक्षारोपन

औरंगाबाद ,२६ जून /प्रतिनिधी :-  आरोग्य, कृषी, विक्री, विपणन आदी व्यवसाय क्षेत्रात गुणवत्तेला अधिक प्राधान्य अत्यावश्यक आहे. गुणवत्तापूर्ण सेवा, उत्पादनालाच बाजारात, सेवा क्षेत्रात अधिक मागणी असते. त्यामुळे प्रत्येकाने व्यवसायात गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. तरच व्यवसाय, सेवा क्षेत्रात यशस्वी होता येते,  असा यशस्वी होण्याचा मंत्र जिल्हाधिकारी 

तथा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज तरूणांना दिला.

Image

जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृति शताब्दी कृतज्ञता पर्व, जयंतीनिमित्त छत्रपती 

शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव ‍विकास संस्था (सारथी) आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबींसाठी कौशल्य ‍विकास जनजागृती मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी सारथीचे प्रकल्प संचालक डॉ. श्रीकांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 

विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे डॉ. भास्कर साठे, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त 

सुरेश वराडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी  आदींसह युवा वर्गाची बहुसंख्येने उपस्थिती होती.

 जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात अतुलनीय असे मोलाचे कार्य केले आहे. 

त्यामध्ये प्रामुख्याने शेती, सिंचन, शिक्षण, रोजगार आदी क्षेत्रांचा समावेश आहे. प्रत्येकाने कौशल्य विकासावर भर देत लोकराजा शाहू महाराजांचा ‍विचार अंगीकारणे काळाची गरज आहे. सारथीकडून कौशल्य विकास कार्यक्रमांवर 

अधिक भर देण्यात येत आहे. लक्षित गटाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने सारथीला पाठबळ दिले 

आहे. 

Image

औरंगाबाद जिल्हा औद्योगिक, पर्यटनदृष्ट्या व्यवसाय, सेवा क्षेत्रास अनुकुल असा जिल्हा आहे. त्यामुळे येथील युवांना अधिक प्रशिक्षित करून, त्यांच्या नवकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे कार्य सारथी, रोजगार केंद्राच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षाही श्री.चव्हाण यांनी व्यक्त केली.  युवांनी देखील विकेल ते पिकेल या धरतीवरच येथील विविध सेवा क्षेत्रात पुढाकार घेऊन व्यवयायभिमूख होण्याचा सल्लाही श्री.चव्हाण यांनी उपस्थित तरूण वर्गाला दिला. प्रत्येकाने आपण 

समाजाचे, देशाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सारथीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अभ्यासवर्गाचे, प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असते.   मराठा, कुणबी, 

कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील युवकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.

सुरूवातीला राजर्षी छत्रपती शाहू यांच्या प्रतिमेस श्री.चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वराडे यांनी केले. सूत्रसंचालन संजीव साठे 

पाटील यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाकडून समता दिंडी

Image

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन समता 

दिंडी काढून साजरा करण्यात आला. या ‍दिंडीला जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी हिरवी झेंडी दाखवली. दिंडीत शिशु 

विहार, छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयाच्या आयुर्वेद, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत 

छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष केला. जिल्हाधिकारी यांनी या महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष 

सहाय्य विभाग कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक सतीश साळवे, संजय दडपे, सीमा शिंदीकर, बेबी दांडगे, सुधा कांबळे, संजय देवकते, मनोज बोहरा, कडुबा इंगळे, शरद वाघमारे, वैशाली बागल, सुनीता थिटे, दख्खन पटेल, बबन आडसूळ, पंकज गजहंस, कृष्णा महाडिक, अजय जारवाल, निर्मला बारसे, अनिता वैष्णव, नेहा व्यंकटपूरवार, कमल लाहोट, इम्रान फारुकी, प्रशांत पाटील, आतिष ससाने  आदींसह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.  

Image

मराठवाडा इको बटालियनचे कार्य कौतुकास्पद

मराठवाड्यातील वनक्षेत्र कमी आहे, वन क्षेत्र वाढविण्यासाठी भारतीय सैनिकांच्या मराठवाडा इको बटालियनचे महत्त्वपूर्ण योगदान लाभत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी  बटालियनचे जवान परिश्रमपूर्वक वृक्ष लागवड, संवर्धनाचे काम करत आहेत,  ते कौतुकास्पद आहे, असे म्हणत बटालियनच्या कार्याचे कौतुक श्री.चव्हाण यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधत आज गोगाबाबा टेकडी परिसरात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. निसर्गाचे आपण देणे लागतो, या भूमिकेतून प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी, त्याचे 

संवर्धन करावे, पाण्याचा सुयोग्य वापर करावा, असा संदेश यावेळी श्री.चव्हाण यांनी दिला. हेरिटेज वॉक, होल्डिंग हँडस या संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास इको बटालियनचे कर्नल एम.ए.खान, 

कॅप्टन हीत मेहता, संस्थेचे सुरेश सिरसीकर,  रवींद्र बनकर, अपर्णा मेहता, सस्मिता डोंगरे, राजेश फतेलष्कर आदींची उपस्थिती होती.