पाणीपुरवठ्याच्या कामासाठी अडथळ्यांची शर्यत 

किमान उपलब्ध तेथे तरी खंड कमी करण्याच्या औरंगाबाद खंडपीठाची अपेक्षा  छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरवासियांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याच्या वृत्ताची दखल घेत खंडपीठाने चिंता व्यक्त करून ज्या भागात नव्या जलवाहिनीच्या कामातील जलकुंभ तयार आहेत तेथे तरी किमान आठ दिवसांपेक्षा कमी कालावधीत पाणी द्यावे, अशी अपेक्षा न्या. रवींद्र घुगे  व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी व्यक्त केली.  मात्र, कामातील अडथळ्यांची कारणे सुनावणीवेळी देताना सध्या मजुरांची कमतरता भासत असल्याचे कंत्राटदारांच्या विधिज्ञांकडून सांगण्यात आले. जलवाहिनीच्या कामानुसार जमीनस्तरावर  सहा व जमिनीपासून उंच ५३, असे मिळून ५९ जलकुंभ करण्यात येणार असून अद्यापपर्यंत केवळ चार जलकुंभाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या अनुषंगाने  हनुमान टेकडी परिसरातील जमीनस्तरावरील २१.३० लाख लीटर क्षमतेचा, टिव्ही सेंटरनजीक उंचावरील २१ लाख लिटरचा, हिमायतबाग भागातील ३८ लाख लिटर व दिल्ली गेट परिसरातील ३० लाख लिटरचा जलकुंभ पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यातील हनुमान टेकडी व टिव्ही सेंटर परिसरातील जलकुंभ ३१ ऑगस्टपर्यंत तर हिमायतबागेतील ३० सप्टेंबरपर्यंत व दिल्ली गेटचा जलकुंभ ३१ ऑक्टोबरपर्यंत देण्याचे आदेश यापूर्वीच  खंडपीठाने दिले आहेत. याेजनेच्या कामांच्या अडथळ्यांची माहिती कंत्राटदाराच्या वकिलांकडून देण्यात आली. त्यामध्ये मजुरांची कमतरता भासत असल्याचे खंडपीठापुढे सांगण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खंडपीठापुढे शीर्ष कामांच्या संदर्भाने दिलेल्या अहवालात जायकवाडीतील 

Read more