वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Pooja Chavhan case | संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी अखेर सही केली  आहे.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे.

टीकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. याप्रकरणात काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे पूजा मृत्यू प्रकरणी संशयाची सुई संजय राठोड यांच्याकडे जात होती. पूजाच्या मृत्यूनंतर  तिच्यासोबत राहणारा अनिल राठोड सुद्धा फरार आहे. स्वतः संजय राठोड 15 दिवस माध्यमांसमोर आले नव्हते. 

15 दिवसांनंतर  संजय राठोड बाहेर आले परंतु पोहरादेवी येथे आपलं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी होय. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पटली नसल्याचे बोलले जाते. त्यानंतर राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी जास्त दबाव वाढला. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याआधी संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना दिला होता.