नांदेड जिल्ह्यात 43 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

नांदेड दि. 11 :- शुक्रवार 11 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 32 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 11 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 47 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 891 अहवालापैकी 842 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 771 एवढी झाली असून यातील 19 हजार 699 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 321 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 14 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. मंगळवार 8 डिसेंबर रोजी सुमेधनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर शुक्रवार 11 डिसेंबर रोजी कलामंदिर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 556 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 7, मुखेड कोविड रुग्णालय 3, हदगाव कोविड रुग्णालय 13, कंधार तालुक्यांतर्गत 9, देगलूर कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 6 असे एकूण 47 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.83 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 25, भोकर 1, कंधार 1, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 2, बिलोली 1, मुखेड 1 असे एकुण 32 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, हदगाव तालुक्यात 1, परभणी 1, तेलंगणा 1, कंधार 1, भोकर 1, यवतमाळ 1 असे एकुण 11 बाधित आढळले. जिल्ह्यात 321 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 62 हजार 25एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 37 हजार 267एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 771एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 699एकुण मृत्यू संख्या-556उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.83 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंकआज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-431रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-321आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-14.