परभणी जिल्ह्यात 148 रुग्णांवर उपचार सुरू, 8 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 8 :- जिल्ह्यातील 8 रुग्णांचे अहवाल दि.7 डिसेंबर 2020 रोजी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7273 एवढी झाली आहे. त्यापैकी 6834 बरे झाले तर 291 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 148 जणांवर उपचार सुरु असून दि.7डिसेंबर रोजी एकुण 23 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सूट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकुण 1 हजार 757 बेड उपलब्ध असून ॲक्टीव्ह बेड 148 तर व्हॅकन्ट बेड 1 हजार 609 आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.