नांदेड जिल्ह्यात 55 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

नांदेड दि. 1 :- रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 45 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 55 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 16 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 45 अहवालापैकी 981 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 174 एवढी झाली असून यातील 17 हजार 979 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 532 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 35 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालानुसार एका बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी विष्णुपुरी नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 514 एवढीच आहे.