सीरमच्या लसीला परवानगी,कोविड लसीकरणाच्या आज सराव फेरी

 UK Oxford-AstraZeneca COVID vaccine compare

नवी दिल्ली, 1 जानेवारी:  भारतात कोरोना लशीसंदर्भात (Corona Vaccine) नेमलेल्या तज्ज्ञ समितीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच चांगली बातमी दिली. Oxford-AstraZeneca Vaccine ची लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे.सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. त्यापाठोपाठ Made In India लस असलेल्या भारत बायोटेकच्या लशीला मान्यता मिळण्याची प्रतीक्षा होती, पण या निर्णयासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.’नव्या वर्षाच्या स्वागतालाच आपल्याकडे चांगली बातमी येऊ शकते’, असं सूतोवाच औषध महानियंत्रकांनी( DCGI) कालच केलं होतं. त्यानंतर आज तज्ज्ञ समितीची बैठक झाली. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने शोधलेल्या आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत असलेल्या कोव्हिशील्ड या लशीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर तज्ज्ञ समितीसमोर भारत बायोटेकचं प्रेझेंटेशन सुरू झालं. पण त्यांच्याकडे आणखी काही डेटा या समितीने मागितला आहे. त्यामुळे या भारतीय बनावटीच्या लशीला हिरवा कंदिल मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं होतं. आता सीरमच्या कोविशिल्ड ला आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. 

2 जानेवारी  2021 रोजी होणाऱ्या कोविड -19 लसीकरणाच्या सराव फेरीसाठी देशभरातील विविध ठिकाणच्या सज्जतेचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक झाली.देशभरात सराव फेरी गोंधळाविना पार पडावी यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती  मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांना दिली. यामध्ये सराव घेणाऱ्या चमूच्या प्रत्येक संभाव्य प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी टेलिफोन ऑपरेटरच्या संख्येत वाढ, ठिकाणांच्या प्रत्यक्ष तपासणीसाठी तालुका स्तरावर कृतीदलाची स्थापना, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात योग्य समन्वय राखण्याची गरज आहे ज्यामुळे नंतर लसीकरण मोहिमेच्या व्यापक अंमलबजावणीला मदत होईल असे डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले.