परभणी जिल्ह्यात 179 रुग्णांवर उपचार सुरू, 17 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 28 :- जिल्ह्यातील 17 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 445 एवढी झाली आहे. त्यापैकी 6 हजार 4 बरे झाले तर 262 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 179 जणांवर उपचार सुरु आहेत. मंगळवार दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी एकुण 33 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 690 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 179 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 511 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.