मुंडे बहिण-भावात भडकले ट्विटर वॉर

बीडचे सत्ताधारी पाहतात केवळ माफियांचे हित-धनंजय मुंडे यांच्यावर बरसल्या पंकजा मुंडे

अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टींची माहितीच नसतेधनंजय

Dhananjay Munde defeats estranged cousin Pankaja in bitterly fought battle  for Parli

बीड ,१६ एप्रिल /प्रतिनिधी 

राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यात आता ट्विटर वार सुरू झाल्याचं दिसत आहे. कारण, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर व लसींच्या निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिताना, धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यावर धनंजय मुंडेंनी ट्विट करत प्रत्युत्तर देखील दिलं. मात्र आता धनंजय मुंडेंनी केलेल्या या ट्विटवर पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं असून, ट्विट करत निशाणा देखील साधला आहे.पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहताना परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनाही टोला लगावला होता. यावरुनच धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात ट्विटरवॉर रंगलं आहे.पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी दिलेल्या उत्तरांवर पंकजा यांनी पुन्हा पलटवार केला आहे.

Image

धनंजय मुंडे यांच्यावर बरसल्या पंकजा मुंडे
बीडमधील सत्ताधार्‍यांना केवळ माफियांचे हित माहीत आहे. लसीच्या बाबतीत जिल्ह्यात दुजाभाव होत आहे. अत्यल्प लसींचा पुरवठा झाला आहे. मात्र, येथील लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नाही, अशा शब्दात भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.

Image

या संदर्भात पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून जिल्ह्याविषयी होत असलेल्या भेदभावाकडे त्यांचे लक्ष वेधले. जनतेच्या हितासाठी लढण्यास आम्ही तयार आहोत, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
पंकजा मुंडे आपल्या पत्रात म्हणतात, बीड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून आलेल्या लसींमध्ये बीड जिल्ह्याला सर्वांत कमी लसी मिळाल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी पत्रातून केला आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 729 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या 35 हजाराच्या आसपास गेली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे बाधितांसाठी लागणार्‍या रेमडेसिविरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. बाधित व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. बीड जिल्ह्यात खासदार प्रीतम मुंडे या कोरोना केंद्रात जाऊन रुग्णांशी चर्चा करताहेत, प्रशासनासोबत बैठका घेऊन माहिती गोळा करत आहेत. मग अशा परिस्थितीत धनंजय मुंडे कुठे आहेत असा सवाल भाजपा कार्यकर्ते समाज माध्यमातून विचारत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे उत्तर

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pamkaja Munde) यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उत्तर दिलंय.  अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

धनंजय मुंडे काय म्हणाले : अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत, त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्यात, हे काहींना ज्ञात नसेल. बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो.जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा, पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको. कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे, मा. आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये?