एक इंचभर जमिनही कुणाला बळकावू देणार नाहीत-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

Image

नवी दिल्‍ली, 25 ऑक्‍टोबर 2020


आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्कीमच्या राष्ट्रीय महामार्ग 310 च्या 19.85 किलोमीटरच्या पर्यायी मार्गापैकी 0.00 किमी ते 19.350 किमी लांबीचा पर्यायी मार्ग राष्ट्राला समर्पित केला. अतिपर्जन्यामुळे झालेले व्यापक नुकसान आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे हा रस्ता खराब झाला होता त्यामुळे नव्या रस्त्याची  विशेषत: नथुला क्षेत्र आणि सर्वसाधारणपणे पूर्व सिक्कीम येथे संरक्षण तयारीच्या दृष्टीने गरज निर्माण झाली होती. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभात संबोधित करतांना संरक्षणमंत्र्यांनी कमीत कमी वेळात आणि अनुकूल खर्चात हा रस्ता तयार केल्याबद्दल सीमा रस्ता संघटनेचे (BRO) अभिनंदन केले.राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर दार्जीलिंगच्या सुकना वॉर मेमोरिअल येथे शस्त्रपूजन केले. ते म्हणाले, “चीनसोबतचा तणाव शांत व्हावा, अशी भारताचीही इच्छा आहे. या भागात शांततापूर्ण वातावरण असेल, अशी माझी पूर्ण खात्री आहे. तसेच आपल्या सैन्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे की, ते एक इंचभर जमिनही कुणाला बळकावू देणार नाहीत.”

Image


 

संरक्षणमंत्र्यांनी सरकारच्या दूरदूरच्या भागांत केवळ संरक्षणाच्या दृष्टीकोनातूनच नव्हे तर सामाजिक आर्थिक विकासाला देखील गती देण्याच्या दृष्टिने केलेल्या विकासाच्या पायाभूत सुविधांच्या प्रयत्नांच्या मोहीमेची गणती केली. केंद्राने गतीशीलतेने केलेले प्रयत्न आणि पंतप्रधानांच्या ईशान्य धोरणनीती कायद्याच्या सहमतीने, पायाभूत सुविधा तयार करण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार करत 2009 पासून थांबलेल्या या पर्यायी मार्गाचे ज्या गतीशीलतेने गेल्या दोन वर्षांत काम झाले त्यावर राजनाथ सिंह यांनी प्रकाश टाकला.

Image

सिक्कीमचे मुख्यमंत्री श्री. प्रेम सिंग तमांग यांनी या पर्यायी मार्गामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळून सामाजिक आर्थिक विकास होईल, अशी सकारात्मक आशा व्यक्त केली. या राज्याचा पर्यटन हा महत्वाचा आर्थिक आधार आहे यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आणि त्यांनी सीमा रस्ते संघटना आणि केंद्रसरकारने जलद गतीने पूर्ण केलेल्या या कार्याबद्दल आनंद व्यक्त केला.   

सीमा रस्ता संघटनेने गेल्या काही वर्षांत आपल्या साधनसामुग्रीत नव्या तांत्रिक बाबी अंतर्भूत करत, साधनसामुग्री आणि बांधकाम तंत्रज्ञान क्षमतांमधे अभूतपूर्व वाढ केली आहे.

Image

अटल भुयार, डीएस-डीबीओ रोड, राष्ट्रीय महामार्ग 310 चा नवा पर्यायी मार्ग, ही याच्या उत्तम दर्जा आणि परिणामकारक कार्याची उदाहरणे असून बीआरओ सामरीक आणि परीचालन कार्य उत्तम रीतीने करण्याकडे वाटचाल करत आहे. संरक्षणमंत्र्यांनी यावेळी बीआरओच्या भविष्यातील कार्यावर प्रकाश टाकला आणि येत्या काही वर्षांत आत्मनिर्भर भारत ही मोहीम अनेक दिशांंनी प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला.