औरंगाबाद जिल्ह्यात ३५३७० कोरोनामुक्त, १०५६ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक २५ : औरंगाबाद जिल्ह्यात आज ३३४ जणांना (मनपा २४६, ग्रामीण ८८) सुटी देण्यात आली. आजपर्यंत ३५३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण १०५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७४८१ झाली आहे. आजपर्यंत एकूण १०५५ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण १०५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मनपाकडून २१ आणि ग्रामीण भागात ०३ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (४७) शिवाजी नगर (४), समाधान कॉलनी (१), औरंगपुरा (३),चिकलठाणा (१), पडेगाव (३), घाटी परिसर (१),विजय नगर (१), न्याय नगर (१), बीड बायपास (२), अन्य (४), देवप्रिया सो., (१), शिवनेरी कॉलनी (१), व्यंकटेश नगर (१), एन नऊ, पवन नगर (२), सातारा परिसर (२), गारखेडा (१), जयश्री कॉलनी, मुकुंदवाडी (२), एन दोन सिडको (१), प्रताप नगर (२), सुपारी हनुमान मंदिर रोड (१), एन वन सिडको (१), धावणी मोहल्ला (१), दशमेश नगर (१), सूतगिरणी चौक परिसर (१), टीव्ही सेंटर (१), जळगाव रोड, हडको (१), ज्योती नगर (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), कासलीवाल पूर्वा सो., चिकलठाणा (२), सैनिक कॉलनी, पहाडसिंगपुरा (१), देवगिरी कॉलनी, मुकुंदवाडी (१)

ग्रामीण (३७) वाळूज (१), तृप्ती हॉस्पीटल, दौलताबाद (२), गणेश कॉलनी, कन्नड (5), समर्थ नगर, कन्नड (१), शहापूर, गंगापूर (१), नेवरगाव (१), टेंभापुरी, गंगापूर (१), घानेगाव, गंगापूर (१), पाटील गल्ली, वैजापूर (१) सावंगी, फुलंब्री (१), वैजापूर (१), बाबरा, फुलंब्री (१), मखरणपूर, कन्नड (७), चाफानेर (१), उपळा, कन्नड (१), देवळाणा, कन्नड (३), देवपूर, कन्न्ड (१), करंजखेड (१),निवारा नगर, वैजापूर (१), टिळक नगर, कन्नड (१), सिडको महानगर (१), फुलंब्री (१), गंगापूर (१), सिल्लोड (१),

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत मांजरी, गंगापुरातील ६५ वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयात हडको एन अकरा, सुदर्शन नगरातील ७८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.