भारतात बरे होणाऱ्यांची एकूण संख्या 70 लाख पार

दुसऱ्या दिवशीही 7 लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण असण्यात भारताने राखले सातत्य

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020

सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने घसरण होण्याचा दाखला भारत सातत्याने देत आहे. सतत दुसऱ्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा कमी आहे आणि ती 6,80,680  इतकी आहे.देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी केवळ 8.71 %  सक्रिय रुग्णांचा समावेश आहे.

सक्रिय रुग्णसंख्या दररोज निरंतर घटत आहे. केंद्र सरकारच्या वतीने यशस्वीपणे राबविल्या जाणाऱ्या टेस्ट, ट्रीट आणि ट्रॅक (चाचणी, उपचार आणि पाठपुरावा) या कार्यपद्धतीचे राज्य / केंद्रशासित प्रदेशांकडून अंमलबजावणी केली जात असल्याचा दाखला आहे.जागतिक महामारीशी लढा देताना या विविध टप्प्यांमध्ये  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सक्रिय रुग्ण संख्येमध्ये बदल दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये दिवसा रोजच्या सक्रिय प्रकरणांमध्ये प्रगतीशील घट झाली आहे.

सक्रिय प्रकरणांचा घटता कल बरे झालेल्या रुग्णांच्या अखंड वाढत असलेल्या संख्येला पूरक आहे. एकूण बरे झालेल्या रुग्ण संख्येने 70 लाखांचा उल्लेखनीय टप्पा ओलांडला आहे आणि 70,16,046 इतका आहे. राष्ट्रीय पातळीवरील रुग्ण बरे होण्याचा दर 89.78 % पर्यंत वाढला आहे.एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 61 % रुग्ण हे 6 राज्य / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत, उदा. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि दिल्ली.

अलिकडच्या काही दिवसांमध्ये नव्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ओलांडले आहे. 67,549 कोविड रुग्ण बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासात 53,370 इतकी नवीन रुग्णसंख्या आहे.बरे झालेले 77  % रुग्ण हे 10 राज्य  / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत, असे निरीक्षण आहे.महाराष्ट्रात एका दिवसात 13,000 पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले असल्याची नोंद आहे.

गेल्या 24 तासांत 53,370 नवीन रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. नवीन रुग्ण संख्येपैकी 80 %  रुग्ण हे 10 राज्य  / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.केरळमध्ये 8,000 पेक्षा अधिक आणि महाराष्ट्रात 7,000 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.गेल्या 24 तासांत 650 मृत्यूंची नोंद झाली आहे.यापैकी, 10 राज्य  / केंद्रशासित प्रदेशांमधील 80 %  आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 184 मृत्यूंची नोंद झाली आहे.