लातूर जिल्ह्यासाठी दिलासादायक दिवस , 04 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज

लातूर, दि. 1:- उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना साथरोगाने बाधित झालेल्या दोन रुग्णांनी केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे उपचार घेतले असून आज सायंकाळी त्या दोन रुग्णांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत रुग्णालय प्रशासनाने डिस्चार्ज देऊन घरी सोडले. तसेच आमदपुर येथील दोन रुग्णांना असे जिल्ह्यात एकूण चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रशासन, रुग्णालय प्रशासन यांनी कोरोना मुक्त झालेल्या 2 व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यात आज 04 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला* अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार वेंकटेश मुंडे, डॉक्टर शशिकांत देशपांडे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतिष हरिदास व इतर सर्व स्टाफ तसेच कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.यातील एक रुग्ण उदगीर तालुक्यातील हंगरगा येथील होता तर एक रुग्ण उदगीर शहरातील होता. उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून दोन रुग्णांना व खंडाळी तालुका अहमदपूर येथील दोन रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 65 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.