TRP रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक, ‘रिपब्लिक’चे नावही – मुंबई पोलीस

मुंबई : खोट्या टीआरपीसाठी (TRP) रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पैसे देऊन टिआरपी मिटरशी छेडछाड करण्यात येत होती. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची धक्कादायक माहिती दिली. पैसे देऊन टीआरपीसाठी छेडछाड करण्यात येत होती. याप्रकरणी दोन मराठी चॅनेलचे मालक ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांना अटक करण्यात आले आहे. तसेच खोट्या टीआरपीसाठी रिपब्लिक चॅनेलचे नाव पुढे आले आहे. काही चॅनेल बंद असताना सुरु ठेवण्यात आली. रिपब्लिक प्रमोटर्स जाळ्यात सापडले आहेत. रिपब्लिकच्या खात्यांची चौकशी होणार आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

TRP क्या है जानिए टीआरपी रेटिंग कैसे तय की जाती है?

टीआरपीवरुन, टीव्हीवरील कुठला कार्यक्रम जास्त पाहण्यात आला, कुठल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती आहे तसेच कुठेल चॅनल सर्वाधिक पाहिले जाते, ते समजते. म्हणून टेलिव्हिजनवर टीआरपी रेटिंगला खूप महत्त्व असते.

या रॅकेटबद्दल सविस्तर माहिती देताना परम बीर सिंह म्हणाले की, ‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. “मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला” असे सिंह यांनी सांगितले.

“या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन अन्य चॅनलच्या मालकांना आज अटक करण्यात आली असे अधिकाऱ्याने सांगितले.

टीआरपी वाढवण्यासाठी

– टीआरपी रेटींग कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना लाच दिली
– टीआरपी मशिन असलेल्या घरांना पैशांचे आमिष दाखवले
– विशिष्ट चॅनेल दिवसभर सुरु ठेवण्यासाठी महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले
– वाढलेल्या टीआरपीमुळं जास्त दरानं जाहिराती मिळवल्या
– महागड्या जाहिरातीतून कोट्यवधींचा अवैध नफा चॅनेल्सनी कमावला

गेल्या काही दिवसांपासून आमच्या अनेक केसे संदर्भात आम्ही माहिती दिली होती. खोटी माहिती पसरवली जात होती. सोशलमीडियावर फेक अकाऊंट फॉल्स टीआरपीचा रॅकेट पुढे आले आहे. देशात २००० बॅरोमीटर लावण्यात आले आहे. बॅरोमीटर लावण्याचे आणि दुरुस्तीचे काम हंसा कंपनीकडे  देण्यात आले होते. हंसा कंपनीचे माजी कर्मचारी बॅरोमीटर असणाऱ्या घरांची माहिती पुरवत असे हेच कर्मचारी लोकांना पैसे देऊन काही खास चॅनल लावायला सांगत होते, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.प्रकरणी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्याच्या खात्यातून २० लाख रुपये मिळाले आहेत, तसेच ८ लाख रुपये जप्त केले आहेत. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा या चॅनलच्या मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. बीएआरसीने दिलेल्या  रिपोर्ट नुसार रिपब्लिक टीव्हीचे प्रमोटर, कर्मचारी यासगळ्यात अडकले असलण्याची शक्यता आहे. जाहिरातींमधून टीव्ही चॅनलचे फंड यातून उघड झाले आहेत.

Republic TV To File Criminal Defamation Case Against Mumbai Police  Commissioner Over TRP Fraud Allegation

खोट्या टीआरपीबद्दल रिपल्बिकन वाहिनीचे नाव पुढे आले आहे. टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टीआरपीसाठी ५०० रुपये महिन्याला देण्यात येत होते. फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या प्रमुख तीन चॅनेल आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. तसेच यात आणखी संशयीत असण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास करण्यात येणार आहे. व्यक्ती किंवा संस्था कितीही मोठी असो, जर यात त्यांचा सहभाग असेल तर त्यांची चौकशी होऊन कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.