बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण

सानेगुरूजी साहित्य नगरी,अमळनेर जि. जळगाव,२ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-१ फेब्रुवारीला बाल साहित्य संमेलन पार पडले. या मेळाव्यात बाल साहित्यिकांनी कथाकथन, काव्य वाचन, नाट्य प्रवेश सादर केले होते.यातील निवडक बालकांना खान्देशकन्या बहीणाबाई चौधरी व्यासपीठ येथे आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली.

 काल झालेल्या कथाकथन सत्रात एकूण ६  कथाकथनातून  २ निवडक आकांक्षा पाटील व गार्गी सुनिल जोशी या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली होती.  काव्यवाचनात  एकूण ९ काव्यवाचनातून ओवी तुषार चांदवडकर व प्रांजल अमोल सोनवणे यांची आज सादरीकरणासाठी निवड करण्यात आली होती. नाट्यप्रवेश एकूण ७ नाटय प्रवेशातून

संस्कृती पवनीकर,जळगाव व  शारदा माध्यमिक विद्यालय,कळमसरे  या टीमची निवड करण्यात आली. यानंतर निवड झालेल्या बलसागर भारत होवो पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूल, अमळनेर संघाने सादर केले. बालसाहित्यातील या वर्षाचा भारत सरकारचा साहित्य अकादमी  पुरस्कार प्राप्त बालमेळावा समन्वयक एकनाथ आव्हाड यांचा सत्कार बालमेळावा आयोजकांनी केला. समारोपीय भाषणात एकनाथ आव्हाड यांनी बाल साहित्यिकांनी सादर केलेल्या कलाप्रकराचे कौतुक केले. आजच्या बाल मेळाव्यातील साहित्यातून  उद्याचे दर्जेदार साहित्य घडतील असा आशावाद व्यक्त केला.यावेळी बाल मेळावा टीम संदिप घोरपडे, भैय्यासाहेब मगर , वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे ,श्री.धर्माधिकारी सर, गिरीष दादा चौक, भाऊसाहेब देशमुख, ॲड.सारांश सोनार उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार  भैय्यासाहेब मगर यांनी मानले.