जिल्ह्यात 30 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

71 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.6 (जिमाका) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 71 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 10 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 20 व्यक्तींचा अशा एकुण 30 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 15312 असुन सध्या रुग्णालयात-240 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5305 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-229 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-55273 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-30 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8843 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-45725, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-586, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4578

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-21, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4700 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-18 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-209 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-240,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-33, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-71, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-7047, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1567 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-106276, मृतांची संख्या-229

कोव्हीड हॉस्पीटल,जालना येथे आनंदवाडी, जालना येथील 82 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 57 नागरिकांकडून 8 हजार 100 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 72 नागरीकांकडुन 12 लाख 23 हजार 944 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.