जालना जिल्ह्यात 61 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

64 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.5 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 64 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 61 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 00 व्यक्तींचा अशा एकुण 61 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-15243 असुन सध्या रुग्णालयात-225 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5258 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 101 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-54834 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने – 71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-61 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-8813 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-45,462, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-440, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4575

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 39, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-4679 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती – 65 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 227 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत- 28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-225,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती – 52, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 64, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -6976, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1609 (31 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1,04,924, मृतांची संख्या -228

कोव्हीड हॉस्पीटल, सोनलनगर जालना येथील 53 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुष रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 30 नागरिकांकडून 5 हजार 450 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकुण 6 हजार 15 नागरीकांकडुन 12 लाख 15 हजार 844 रुपये एवढा दंड वसुल करण्‍यात आला आहे.