ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांना पितृशोक, शरदराव लांबे यांचे निधन

औरंगाबाद, १६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- उल्कानगरी परिसरातील रहिवासी शरदराव गोविंदराव लांबे यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. रेल्वे विभागात स्टेशन अधिक्षक म्हणून ते निवृत्त झाले होते. प्रारंभीची काही वर्षे चिकलठाणा रेल्वे स्टेशन येथे ते स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरही ते सेवेत होते. त्यांच्यावर रविवारी सकाळी १० वाजता प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, सामाजिक कार्यकर्ते अभय लांबे व पत्रकार शैलेश लांबे यांचे ते वडील होत.