“अजित पवार गटाच्या २० हजार प्रतिज्ञापत्रांत त्रुटी” :निवडणूक आयोगा  मधील सुनावणी संपल्यानंतर शरद पवार गटाच्या वकिलांचा दावा

नवी दिल्ली :-राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने राजकीय भूकंप झाले. परिणामी ही दोन्ही प्रकरणं निवडणूक आयोग आणि मग सर्वोच्च न्यायालयात गेले. सध्या राष्ट्रवादी पक्षनाव आणि पक्षचिन्हाचा तिढा निवडणूक आयोगात आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा करत निवडणूक आयोगात याचिका केली होती. याप्रकरणी सुनावणी सुरू असून आज (९ नोव्हेंबर) शरद पवार गटाने बाजू मांडली. शरद पवार गटाकडून ज्येष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. तर, सुनावणी वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. सुनावणी संपल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

“निवडणूक आयोगात आता दीड तास सुनावणी झाली. या सुनावणीत आमच्याकडून युक्तीवाद सुरू झाला. आम्ही खूप चमत्कारीत तथ्य निवडणूक आयोगासमोर ठेवले. जे दस्तावेज याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगात दाखल केले होते, त्यापैकी २० हजार प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत. तर, ८ हजार ९०० प्रतिज्ञापत्रांची चार्ट बनवून निवडणूक आयोगात सादर केले आहेत. यामध्ये भ्रष्ट, विकृत पद्धतीने दस्तावेज आणि प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत”, असा दावा सिंघवी यांनी केला.

आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि पक्ष याबाबतच्या वादासंबंधी सुनावणी होती. फुटीर गटातर्फे जे अॅीफिडेव्हीट देण्यात आलं होतं. त्या अॅलफिडेव्हीटमध्ये जी काही प्रतिज्ञापत्र जोडली होती, त्याची चिरफाड अभिषेक मनुसंघवी या ज्येष्ठ वकिलांनी केली. त्यांनी त्या अॅ्फिडेव्हिटचे 24 भाग बनवले आणि त्याच्यामध्ये दाखवून दिलं की, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्र जोडली होती, वृद्धांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सदस्य दाखविले होते. मृत व्यक्तींच्या नावाने प्रतिज्ञापत्र होती. एका प्रतिज्ञापत्रावर तर हाऊस वाईफ हे नाव लिहीण्यात आलं होतं. काही ठिकाणी एकाचेच नाव तीन वेळा टाकण्यात आलं होत. एकाच पत्त्यावर अनेक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आली होती. वेरीफिकेशन लातूरचं आणि प्रतिज्ञापत्र मुंबईचं. अशा प्रकरणात जवळ-जवळ 20 हजार प्रतिज्ञापत्र ही खोटी सादर करण्यात आली आहेत. असं ज्येष्ठ वकील अभिषेक संघवी यांनी निवडणूक आयोगाला पुराव्यासहीत दाखवून दिलं. फुटीर गटाचे वकील ज्येष्ठ विधीतज्ञ मुकुल रोहतगी यांनी खूप युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की, आताच्या क्षणाला याची गरजच नाही. परंतु, निवडणूक आयोगाने ऐकून घेण्याचा निर्णय घेतला. अभिषेक मनुसंघवी यांनी भारतीय संविधानाप्रमाणे प्रतिज्ञापत्रावर खोटं बोलणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि ज्यांनी हे केलं आहे त्यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली. पुढे काय होईल याची मला माहिती नाही. पण, हे सगळं खोट आहे, खोट्याच्या आधारावर आहे. हे मात्र समोर आलं. जे खोट्याच्या आधारावर वागतात ते शेवटी खोटचं करतात हे सिद्ध झालं. निवडणूक आयोग काय निकाल देईल याच्याशी फार काही मला समजून घ्यायची ईच्छा नाही. पण पुराव्यानिशी हे सिद्ध करण्यात आलं की, हे केलेलं सगळं खोट होत. म्हणजे मी जे म्हणतोय तेच ‘अधर्माविरुद्ध धर्माची लढाई’

“मृत व्यक्तींचेही प्रतिज्ञापत्र यात आहेत, अल्पवयीन मुलांचंही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. एनसीपीच्या संविधानात नसलेली पदेही दाखवण्यात आलं आहे. गृहिणी, झोमॅटोचा सेल्समन दाखवून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. याप्रकारे २४ कॅटगिरी बनवल्या आहेत. यामार्फत आम्ही स्पष्ट केलं की हे चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र बनवण्यात आले आहे. याचा अर्थ अजित पवार गटाकडे कोणतंही समर्थन नाही. आता पुढची सुनावणी २० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी अजित पवार गटावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. चुकीची विधानं, चुकीची प्रतिज्ञापत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, असं सिंघवी म्हणाले.

अजित पवार गटाची प्रतिक्रिया काय?

निवडणूक आयोगासमोर आजपासून नियमित सुनावणी चालू होणं अपेक्षित होतं. पण काही किरकोळ शपथपत्रांमधल्या तांत्रिक बाबी समोर करून शरद पवार गटाकडून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी होईल, असं सूचित करण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.