पैठण व फुलंब्री तालुक्यातील निराधारांच्या बँक खात्यात अनुदान जमा

छत्रपती संभाजीनगर ,८ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निराधारांसाठी दिवाळी प्रकशमय होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पैठण व फुलंब्री तालुक्यातील निराधारांना दिलास मिळाला आहे.

पैठण तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेसह, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, विधवा, दिव्यांग योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे सप्टेंबर पर्यंत 11 हजार 922 लाभार्थी असुन त्यांची रक्क्म रु.4 कोटी 97 लक्ष 35 हजार 800  व ऑक्टोंबर पर्यंत 12 हजार 957 लाभार्थी असुन त्यांची रक्कम रु.2 कोटी 49 लक्ष 36 हजार 600 इतकी आहे.

तसेच फुलंब्री तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे सप्टेंबर पर्यंत 11 हजार 488 लाभार्थी असुन त्यांची जून 2023 पासूनची रक्क्म रु.5 कोटी 57 लक्ष 70 हजार 700 इतकी आहे.

पैठण – फुलंब्री तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी संख्या 5 हजार 103 अनुदान वाटप 75 लक्ष 93 हजार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना लाभार्थी 5 हजार 774 अनुदान वाटप 86 लक्ष 61 हजार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (राज्याचा हिस्सा) लाभार्थी 1 हजार 628 अनुदान वाटप 81 लक्ष 40 हजार 200, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी 311 अनुदान वाटप 3 लक्ष 73 हजार 200, इंदिर गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना लाभार्थी 141 अनुदान वाटप 1 लक्ष 69 हजार 200 रुपये अनुदान जमा झाले आहेत.

पैठण व फुलंब्री तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण रु.13 कोटी 04 लक्ष 43 हजार 100 एवढी रक्कम जमा केली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री सोहम वायाळ यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.