मराठा- धनगर समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे:-शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 

मुंबई,२९ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे . सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे. व ते त्यांना मिळायला हवे.ओबीसी, आदिवासी  सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे.

जरांगेपाटील उपोषण करीत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे..पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही.