सभासद नोंदणीचा फायदा निश्चितपणे कॉंग्रेस पक्षाला होईल-कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे

फुलंब्री,७ मार्च / प्रतिनिधी :- सभासद वाढीच्या दृष्टीने संघटना महत्वाची आहे. आगामी निवडणुकीत या सभासद नोंदणीचा फायदा निश्चितपणे कॉंग्रेस पक्षाला होईल असा विश्वास कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी व्यक्त केला.

Displaying IMG_20220307_195315.jpg

तालुक्यातील शेलगाव येथुन कॉंग्रेस पक्षाची डिजीटल सदस्य नोंदणीची सुरुवात सोमवार ( 7 मार्च)   करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.तालुका कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, मुख्य नोंदणीकर्ता किरण डोणगावकर, संतोष मेटे, पुंडलिक जंगले, सुदाम मते, बाबुराव डकले, विठ्ठल कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.सोमवारी फुलंब्री तालुक्यात जिल्हा परीषद गटनिहाय शेलगाव, बाबरा, पाल व वानेगाव येथे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.

यावेळी पुढे  बोलताना डॉ. कल्याण काळे म्हणाले की, वडोदबाजार सर्कल असो की तळेगाव की तालुक्यातील पंचायत समिती सर्व गट व गण हे  काँग्रेस पक्ष पुर्ण ताकतीने लढले व निवडनही आणुु आगामी निवडणुक ही कॉंग्रेस पक्ष जोमाने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी विठ्ठलराव कोरडे, मनोज शेजुळ, रंगनाथ कोलते, नथ्थु इधाटे, सुरेश फुके, मुदस्सर पटेल, राजेंद्र ठोंबरे, मंगेश मेटे, मंगेश साबळे, कचरु साबळे, विठ्ठल कोलते, विनोद लहाने, सुरेश इधाटे, साई बलांडे, गणपत व्यवहारे, सर्जेराव सुस्ते,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. व या वेळी रांजणगाव  येथील सुभाष कोंडके, तुकाराम कोंडके, माजी उपसरपंच गणेश कोंडके ग्रामपंचायत सदस्य यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.