भाग्यनगरच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून घेतला- अर्जुन खोतकर

जालना ,१५ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-जालना महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २५ मधील भाग्यनगर येथील विकास कामासाठी करोडो रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला असून यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय आण्णाभाऊ साठे स्मारक ते मिसाळ टावर पर्यंतच्या सी.सी. ट्रिमिक्स पद्धतीने रोड व मोठ्या नाल्याचे बांधकामाचा समावेश आहे. यासाठी वैशिष्ट्यपुर्ण योजनेतुन एक कोटी तीस लाख रुपये व भाग्यनगर येथील ओहर ब्रिज ते आश्लेषा कीड पर्यंतच्या डीपी रोड बांधकामासाठी जिल्हा नियोजन विकास विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर करून घेतले.या कामाचा शुभारंभ आज होत आहे याचा आपणास आनंद होत आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले .

या कामाचा शुभारंभ १५ ऑक्टोबर रोजी नवरात्राच्या प्रारंभ प्रसंगी करण्यात आला.त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर पुढे बोलताना ते म्हणाले की डी पी रोडच्या उर्वरित कामासाठी आणखी दोन कोटी रुपये अपेक्षित असून तसा प्रस्ताव देखील मंजुरस्तव सादर केलेला आहे तसेच अण्णाभाऊ साठे स्मारक ते मुक्तेश्वर द्वार पर्यंतच्या बाह्य रस्त्याच्या कामासाठी देखील पाठपुरावा सुरू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे त्याचा पाठपुरावा देखील सुरू असुन लवकरच या कामाला देखील मंजुरी मिळणार आहे.आणि आता सुरू होत असलेले काम दर्जेदार करून घ्यावे अशा सूचना देखील उपस्थित सा.बा. विभागाचे उपअभियंते श्री चंद्रशेखर नागरे व मनपाचे बांधकाम अभियंता सऊद यांना केलेल्या आहेत.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते, उपजिल्हाप्रमुख गणेश सुपरकर, जेष्ठ नागरिक रमेश काका गर्दास, भीमराव पाटील जगताप, श्रीकांत शेलगावकर ,नारायणराव ढगे ,शिवाजीराव गोंटे,भोसले अरविंदराव ,डॉक्टर उत्तमराव कांगणे ,जगन्नाथ नाना गारुळे, देशपांडे काका ,थोरवे साहेब, कृष्णा भाऊ खोतकर, प्रसाद वाडेकर ,माजी नगरसेवक संताजी वाघमारे ,राम सतकर, गोपीकिशन गोगडे, शिवसेना शहर संघटक योगेश रत्नपारखे, युवा सेनेचे शुभम टेकाळे ,सागर पाटील, सुशील भावसार, गणपतराव धोत्रे, सोपानराव कावले ,वैजनाथ कावले, विश्वासराव भोरे ,संजय डुकरे पाटील, राहुल मांगदरे ,किरण सिरसाट यांच्यासह भाग्यनगर येथील रहीवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक गोपीकिसन गोगडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवासेनेचे किरण शिरसाठ यांनी केले.