गड किल्ले स्वच्छता अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व पर्यटन विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दि. 02 ऑक्टोंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील 350 किल्ल्यांची स्वच्‌छता करुन छत्रपती  शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदना करण्याचे आवाहन केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 13 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील प्राचार्य, विद्यार्थी, शिक्षक, व जिल्हा व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी हे जिल्ह्यातील 12 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियानातून छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वंदन करणार आहेत. या अभियानामध्ये जिल्ह्यातील इच्छुक स्वंयसेवी संस्था सहभाग घेऊ शकतात.

सोयगाव तालुक्यात फर्दापूर, वेताळवाडी, वैशागड, सुतोंडा या किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबविणार आहे. सिल्लोड येथी अंजिठा सराय, अंजिठा, कन्नड तालुक्यात अंतुर, लोंझा व पेठका, फुलंब्री तालुक्यात लहुगड, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात देवगिरी किल्ला आणि भागसीमातागड येथे स्वच्छता मोहिम राबविणार आहे. यासाठी समन्वय म्हणून तालुका निहाय स्वंयसेवकाची निवड करण्यात आली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे सोयगाव तालुका आर.एस.बोराडे मो.नं.9049784088, सिल्लोड तालुका एन.डी.काळे 7588765733, कन्नड तालुका पी.एम.जोगदंड मो.नं.9422660205, फुलंब्री तालुका एन.आर. सोनवणे मो.नं 9423446827, छत्रपती संभाजीनगर तालुका एस.ए.मांडे मो.नं.9673477812 गंगापूर तालुका योगेश प्रधान मो.नं.959585216 या तालुकानिहाय समन्वयकाशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून 46 अधिकारी व कर्मचारी 424 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वच्छतेसाठी विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी नागरिक, स्वंयसेवक यांनी अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मंगला पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.