मराठा आंदोलनातील निरापराध तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या :जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

जालना ,४ सप्टेंबर /प्रतिनिधी :- जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या आंदोलकावर झालेल्या
लाठी हल्ल्यानंतर त्याच्या जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या यामध्ये काही ठिकाणी जाळपोळ व सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. या कारणावरूनअनेकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पैकी काही निरपराध तरुणांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. सदरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षकांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केली आहे.
निवेदनात अंबेकर पुढे म्हणाले की, मराठा आंदोलनकर्त्या अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल करतांना अनेक निरापराध व हिंसक कृत्यात सहभागी नसणार्‍यांवरही पोलिस प्रशासना कडून कोणतीही शहानिशा न करता गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे अधिच भीती व संताप अशा या भावनिक वातावरणात असलेल्या लोकांमध्ये पुन्हा रोष निर्माण होत आहे. त्यामुळे झालेल्या घटना व हिंसक कृत्यात ज्या तरूणांचा सहभागच नाही, ज्यांनी शांततामय पद्धतीने आंदोलन केले. अशा तरुणांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत व समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे. जेणेकरून जिल्हयात पूर्ववत शांतता प्रस्थापित होईल. अशी मागणी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना केली.