महावितरण कर्मचाऱ्यांचे राज्य नाट्य स्पर्धेत यश

छत्रपती संभाजीनगर,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलातील कर्मचाऱ्यांच्या ‘अचानक’ या नाटकास सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीच्या ‍द्वितीय पुरस्कारासह ‍विविध पारितोषिकांनी गौरवण्यात आले.

          लोकजागृती बहुउद्देशीय संस्था, वाहेगाव (देमणी) (ता.छत्रपती संभाजीनगर ) या संस्थेतर्फे सादर, श्रावण कोळनूरकर दिग्दर्शित या नाटकास सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मिती द्वितीय, दिग्दर्शन द्वितीय, नेपथ्य द्वितीय, पुरुष अभिनय रौप्यपदक आणि स्री अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र पुरस्कार देण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे नुकतेच तापडिया नाट्यमंदिरात झालेल्या खास समारंभात प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आ.संजय सिरसाट, स.भु. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे  प्रमुख प्रा. किशोर शिरसाट, दिलीप घारे आदी उपस्थित होते. या नाटकात महावितरणचे कर्मचारी श्रावण कोळनूरकर, शिवाजी नरवडे, रमेश ‍शिंदे, सुनील बनसोड, अभय एरंडे, अनिल राजपूत, सदानंद जाधव, अश्विनी पोतलवाड, पल्लवी गायकवाड, अनिता सातदिवे यांनी सहभाग घेतला.

या यशाबद्दल महावितरणचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, लोकजागृती संस्थेचे आत्माराम शिंदे, अविनाश जाधव यांनी या नाट्य संघाचे अभिनंदन केले आहे.