‘कॅपजेमिनी’ या नामांकित कंपनीच्या प्रशिक्षणासाठी छत्रपती शाहू अभियांत्रिकी  महाविद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांची निवड

छत्रपती संभाजीनगर,१९ जुलै  / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर येथील कांचनवाडी स्थित छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण, उत्कृष्ट आणि दर्जेदार प्लेसमेंट, डिजिटल प्लॅटफॉर्म, सर्वोत्तम पायाभूत सुविधा येथे आहेतचं. नुकतेच  महाविद्यालयातील  ५५ विद्यार्थ्यांची ‘कॅपजेमिनी’ या नामांकित कंपनीच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.

‘कॅपजेमिनी’ या नामांकित कंपनीने प्रशिक्षणाची जबाबदारी पुणे येथील FUEL (Friends Union for Energising lives) यांना देण्यात आली. या प्रशिक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांना Python, Machine Learning, Core Java, AI, यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण पुणे येथे FUEL (Friends Union for Energising lives) यांच्या मार्फत देण्यात आले. तसेच विध्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हुवसाठी प्रत्यक्ष मुलाखतीची तयारी करून घेण्यात आली. सदरील प्रशिक्षण हे नामांकित कंपन्यामधील अनुभवी व तज्ञ प्रशिक्षण मार्फत देण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान विविध कंपन्याचे एच.आर. मॅनेजर आणि   प्रोजेक्ट मॅनेजर यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद साधून देण्यात आला. यादरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वातावरणात नोकरी मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे व त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला कसे तयार करावयाचे ?  याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सध्याच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान मिळवून नामांकित कंपनीमधे नोकरी मिळविण्यासाठी स्वतःला तयार करण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट हेड डॉ. संदीप अभंग, प्रो. संजय कुलकर्णी, डॉ. मनोज मते यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.