इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

छत्रपती संभाजीनगर,२८ जून / प्रतिनिधी :-  इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते टॅब वाटप करण्यात आले.

कार्यक्रमावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे उपसंचालक जलील शेख, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त पांडुरंग वाबळे, चंद्रकांत हिवराळे, प्रतिक सिरसे, अशोक दामले उपस्थित होते.  

सहकार मंत्री श्री सावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आश्रमशाळा आता डिजीटल होत चालल्या आहेत. भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्यांना शासनाकडून टॅब उपलब्ध करुन देण्यात येतील, तसेच टॅबचा वापरामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. विजाभजच्या सर्व आश्रमशाळा भविष्यात ई-स्कुल करण्याबाबत शासनाचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.

श्री. जलील शेख यांनी आश्रमशाळेत निपुण भारत प्रशिक्षणातून झालेल्या बदलाबाबत माहिती दिली. औरंगाबाद जिल्हयातील पर्यटनस्थळामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी परदेशी भाषा शिकत आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थी जागतिक दर्जाचे शिक्षण घेत भविष्यात त्याचा उपयोग स्वतः साठी व जिल्हयाच्या विकासासाठी करतील असे असा विश्वास शेख यांनी व्यक्त्‍ केला.