राज्यात केला जाणारा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प

चारही डेपोतून इंधन वाहतूक ठप्प

मनमाड :- मनमाडच्या नागापूर, पानेवाडी परिसरात असलेले इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस प्लांट चारही प्रकल्पातुन इंधन आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे टँकर, ट्रक चालक, मालक आणि ट्रान्सपोर्टर यांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. रात्री अज्ञात लोकांनी हल्ला करून टँकरच्या काचा फोडल्यामुळे संतप्त होऊन हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

आंदोलनात चारही डेपोतील सुमारे २ हजार टँकर, ट्रक सहभागी झाले आहेत. यामुळे डेपोतून राज्यभरात केला जाणारा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला आहे.