वैजापूर विधानसभा मतदारसंघ डॉ. दिनेश परदेशी भाजपचे निवडणूक प्रमुख

वैजापूर ,​९​ जून/ प्रतिनिधी :- आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी  भाजपने रणनीती आखली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुखाची नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांच्याकडे वैजापूर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

आगामी निवडणूक भाजप आणि शिवसेना युती करून लढणार असून शिंदे गटाला सहकार्य करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघामध्येही भाजपने निवडणूक प्रमुख नेमले असले तरी ते शिवसेनेसाठीही काम करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली म्हणजे निवडणूक लढविण्याचा मार्ग बंद झालेला नाही असेही पक्षाने स्पष्ट केले आहे. 

डॉ.दिनेश परदेशी हे वैजापूर पालिकेचे माजी नगराध्यक्ष असून त्यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूकही लढवली आहे. संघटन कौशल्य व त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार असल्याचे डॉ. दिनेश परदेशी म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात झालेल्या विकास कामांच्या जोरावरच आगामी निवडणुकीतही भाजपची सत्ता आणू असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणूकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. दिनेश परदेशी यांचे भाजपचे तालुकाप्रमुख कल्याण दांगोडे, शहरप्रमुख दिनेश राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, गणेश खैरे, शैलेश चव्हाण, सोमू सोमवंशी, गौरव दोडे, शैलेश पोंदे आदींनी अभिनंदन केले आहे.