उद्धव ठाकरे हे परदेशी असतानाच मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची वर्षा बंगल्यावर भेट

राज्याच्या राजकारणामध्ये नेहमीच काहींना काही उलथापालथ होताना दिसत असतात. कधी आरोप-प्रत्यारोप तर कधी पक्षबदल… अशातच नुकतीच राज्यातील सध्याच्या दोन पावरफुल लोकांची भेट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर भेट झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परदेशी असतानाच ही भेट कशी काय झाली? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 

व्हिडिओमध्ये जरी शरद पवार कागदपत्र हाताळताना दिसत असले तरी राजकीय पटलावर कधी काय होईल हे सांगणे कठीणच आहे.   

शरद पवार काय म्हणाले ?

मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली.